“स्टेशन डायरी’चा “पेपरलेस’ कामकाजात अडसर

पिंपरी – स्टेशन डायरी हा पोलीस ठाण्याचा अविभाज्य भाग आहे. मात्र, “पेपरलेस’ कामकाजासाठी डायरी बंद करण्याचे आदेश 15 सप्टेंबर 2015 रोजी पोलीस महासंचालकांनी दिले होते. मात्र आजमितीलाही स्टेशन डायरीचाच वापर पोलिसांकडून होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी स्टेशन डायरी बंद करण्याचा आदेश काढला आहे. डायरी बंद करुन पोलीस ठाण्याचे कामकाज आता क्राइम ऍण्ड क्राईम ट्रॅकिंग नेटवर्क ऍण्ड सिस्टीम्स (सीसीटीएनएस) याद्वारे कामकाज करावे असे आदेशात म्हटले आहे.

गुन्ह्याबाबतचा प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) ऑनलाइन दाखल करण्याचे काम लवकरच पोलीस स्टेशनमध्ये सुरू होणार आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या “एफआयआर रजिस्टर’चा गैरवापर टाळण्यासाठी “एफआयआर’ “ऑनलाइन’ पध्दतीने होणे आवश्‍यक होते. त्यामुळे 2011 मध्ये “सीसीटीएनएस’ प्रकल्प केंद्र सरकारकडून हाती घेण्यात आला. यामुळे पोलीस विभागाचे काम “पेपरलेस’ होऊन “ऑनलाइन’ कामकाजास प्राधान्य मिळणार आहे. पोलीस दलातील बहुतांश अधिकाऱ्यांनी यामुळे नाके मुरडली. तसेच, हे राज्यपातळीवर सुरू असल्याने त्यास उशीर झाला.

अनेकदा गुन्हा दाखल करताना ठाणे अंमलदारापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हस्तक्षेप होतो. सकाळी झालेल्या घटनेची संध्याकाळी उशीरा नोंद करताना त्यावर वेळ मात्र सकाळची टाकली जाते. यातून सुरू झालेला गोंधळ न्यायालयाने निकाल देईपर्यंत कायम असतो. “सीसीटीएनएस’मुळे पासपोर्ट, शस्त्र परवाना, विदेशी पर्यटक विभाग, वाहतूक विभाग, न्यायालय जोडले जाणार असल्याने एका यंत्रणेत सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे. शिवाय “ऑनलाइन’ “एफआयआर’मुळे त्यात कोणत्याही प्रकारची छेडछाड करता येणार नाही. “सीसीटीएनएस’मुळे “स्टेशन डायरी’ची “कॉपी ऑनलाइन’ मिळवता येईल. तपासाची प्रगती “ऑनलाइन’ समजेल तसेच वेळ व खर्च वाचणार आहे. अवघ्या पाच ते दहा मिनिटांत तक्रार नोंदवणे “सीसीटीएनएस’मुळे शक्‍य होणार आहे.

“स्टेशन डायरी’ची प्रत हवी असेल तर संबंधित फिर्यादी किंवा आरोपीला ती “डायरी’ पूर्ण झाल्याशिवाय प्रत मिळत नाही. लोकांना तक्रारी दाखल करणे, “एफआयआर’च्या प्रतींची मागणी करणे, भाडेकरूंची तपासणी करणे, परवान्यासाठी अर्ज, आंदोलन-अर्जासाठी परवाना, कर्मचाऱ्यांची पडताळणी तसेच वस्तूंची तक्रार दाखल करता येणार आहे. तसेच मुळात कामकाज “पेपरलेस’ करण्यासाठी व एकच घटना “डायरी’मध्ये व पुन्हा “सीसीटीएनएस’मध्ये दाखल करणे असे दुहेरी काम पोलीस ठाणे करत आहेत. ते थांबवण्यासाठी हा आदेश पुन्हा काढण्यात आले आहेत.

स्टेशन डायरीच सोयीस्कर
“सीसीटीएनएस’ या प्रणालीमध्ये घटनेची पूर्ण माहिती तत्काळ भरावी लागते. बऱ्याच घटनांमध्ये सर्वच माहिती उपलब्ध होईल, असे नाही. त्यामुळे प्रणाली पूर्ण करणे अवघड जाते. तसेच तांत्रिक बाबी असल्यामुळे पोलीस ठाण्यातील सर्वांनाच एकत्र माहिती उपलब्ध होईलच, असे नाही जे तपासातही कठीण जाते. तर काही कर्मचाऱ्यांच्या मते माहिती भरल्यानंतर ती फाईल पुन्हा “ओपन’ केल असता “फॉन्ट साईज’ हा खूप कमी असतो. तो वाचणे देखील कठीण होते. त्यामुळे कर्मचारी “सीसीटीएनएस’ प्रणाली वापरतात पण त्यांनी “स्टेशन डायरी’ही कायम ठेवली आहे. “स्टेशन डायरी’ बंद करुन त्यातील सर्व नोंदी तातडीने “सीसीटीएनएस’ प्रणालीत भराव्यात व प्रत्येक दिवसाच्या नोंदी या चोविस तासाच्या आत भरून त्याची प्रिंट आऊट काढून पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर जतन कराव्यात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)