स्टेट बॅंक ऑफ मॉरिशसच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, 25 कोटींवर डल्ला 

मुंबई –  स्टेट बॅंक ऑफ मॉरिशसच्या मुंबई शाखेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात आला असून सायबर चोरट्यांनी या शाखेतील 25 कोटी रुपये लांबवले आहेत. चोरट्यांनी बॅंकेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करत विविध खात्यांमध्ये शिरकाव केला.

बॅंकेने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत मागील आठवड्यात शुक्रवारी (5 ऑक्‍टोबर) याबाबत तक्रार नोंदवली होती. चोरट्यांना बॅंकेतील 147 कोटी रुपये चोरण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर या खात्यांमधून सुमारे 25 कोटी रुपये अनेक परदेशी बॅंकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आले. परंतु माहिती मिळताच बॅंकेने वेळीच सर्व खात्यांचे ऑनलाईन व्यवहार बंद केल्याने मोठा अपहार टळला. त्यामुळे परदेशी बॅंकांमध्ये ट्रान्सफरसाठी पाठवलेली रक्कम परत आणल्याची सूत्रांची माहिती आहे.

-Ads-

रहेजा सेंटरमधील पंधराव्या मजल्यावर स्टेट बॅंक ऑफ मॉरिशसची नरिमन पॉईंट शाखा आहे. ब्रान्च इनचार्ज प्रकाश नारायण यांनी या प्रकरणावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. बॅंकेवर सायबर हल्ल्याची नऊ महिन्यातील ही तिसरी घटना आहे. सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)