स्टेट बॅंकेला 7718 कोटींचा तोटा 

अनुत्पादक मालमत्ता वाढल्यामुळे करावी लागली मोठी तरतूद 
नवी दिल्ली – स्टेट बॅंकेला वाढलेल्या अनुत्पादक मालमत्तेपोटी मोठ्या रकमेची तरतूद करावी लागली आहे. त्यामुळे बॅंकेला चौथ्या तिमाहीत तब्बल 7718 कोटी रुपयांच्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. बॅंकेला व्याज व इतर स्त्रोतातून उत्पन्न कमी मिळाले आहे. तर अनुत्पादक मालमत्तेपोटी मोठ्या रकमेची तरतूद करावी लागली आहे. त्याचबरोबर वेतनावरील खर्च वाढला असल्याचे बॅंकेने सांगितले. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत बॅंकेला 2815 कोटी रुपयांचा नफा झाला होता. सरलेल्या पूर्ण वर्षातही बॅंकेला याचा कारणामुळे 6547 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्या अगोदरच्या वर्षात बॅंकेला 10484 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

चौथ्या तिमाहीत बॅंकेला अनुत्पादक मालमत्तेपोटी तब्बल 24080 कोटी रुपयाची तरतूद करावी लागली आहे. यात 119 टक्‍क्‍याची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत बॅंकेला केवळ 10993 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली होती. रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांना अनुत्पादक मालमत्तेपोटी जास्त प्रमाणात तरतूद करण्यास सांगितले आहे. त्यामुळे बऱ्याच बॅंकांना तोटा झाला आहे. त्यात सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे प्रमाण जास्त आहे.

बॅंकेच्या ढोबळ अनुत्पादक मालमत्तेत वाढ होऊन ती 10.91 टक्‍के इतकी झाली आहे. जी की गेल्या वर्षी 6.90 टक्‍के इतकी होती. म्हणजे ढोबळ अनुत्पादक मालमत्ता 223427 कोटी रुपये झाली आहे. तर निव्वळ अनुत्पादक मालमत्ता आता 5.73 टक्के झाली ओ, जी की गेल्या वर्षी 3.71 टक्‍के इतकी होती. म्हणजे निव्वळ अनुत्पादक मालमत्ता 110855 कोटी रुपये झाली आहे. मात्र बॅंकेकडे पुरेसे भांडवल आहे. त्यामुळे आगामी काळात बॅंकेच्या कर्ज वितरणावर परिणाम होणार नसल्याचे बॅंकेने सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)