स्टेट बॅंकेला झाला 4876 कोटींचा तोटा

नवी दिल्ली: पहिल्या तिमाहीतही स्टेट बॅंक ऑफ इंडियाला 4876 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या तीन तिमाहीपासून या भारतीाल सर्वात मोठ्या बॅंकेला तोटा सहन करावा लागत आहे. बॅंकेची अनुत्पादक मालमत्ता वाढल्यामुळे त्यासाठी मोठी तरतूद करावी लागत असल्यामुळे बॅंकेला तोटा होत असल्याचे बॅंकेने सादर केलेल्या ताळेबंदावरून दिसून येत आहे.

गेल्या वर्षी पहिल्या तिमाहित मात्र बॅंकेला 2006 कोटी रुपयांचा नफा झाला होता. तोटा झाला असला तरी बॅंकेच्या पहिल्या तिमाहीतील उत्पन्नात मात्र वाढ होऊन ते 65492 कोटी रुपये इतके झाले आहे. गेल्या वर्षी या तिमाहित बॅंकेचे उत्पन्न 62911 कोटी रुपये इतके होते. बॅंकेला आपल्या नफ्यातील भाग तरतुदीसाठी वापरावा लगला असल्याचे दिसून येते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या तिमाहित बॅंकेच्या ढोबळ अनुत्पादक मालमत्तेत वाढ होवून ती 10.69 टक्‍के इतकी झाली आहे. जी की गेल्या वर्षी या तिमाहत 9.97 टक्‍के इतकी होती. याचा अर्थ बॅंकेने कर्जवसुलीसाठी बरेच प्रयत्न करूनही त्याला परिणामकारक यश आल्याचे दिसून येत नाही. बॅंकेच्या निव्वळ अनुत्पादक मालमत्तेत थोडीशी घट होऊन ती 5.29 टक्‍के इतकी झाली आहे. गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीती बॅंकेची निव्वळ अनुत्पादक मालमत्ता 5.97 टक्‍के इतकी होती.

सध्या बॅंकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता आकड्यात 212840 कोटी रुपये आहे, जी की गेल्या वर्षी या तिमाहित 188068 कोटी रुपये इतकी होती. तर सध्या निव्वळ अनुत्पादक मालमत्ता आकड्यात 99236 कोटी रुपये आहे, जी की गेल्या वर्षी पहिल्या तिमाहित 107560 कोटी रुपये इतकी होती.
या तिमाहित अनुत्पादक मालमत्तेपोटी बॅंकेला तब्बल 19228 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे. गेल्या वर्षी या काळात बॅंकेने 8929 कोटी रुपयांची तरतूद केली होती. बॅंकेने खर्च कमी करण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहे. त्यानुसार परदेशातील काही शाखा बंद केल्या आहेत.

रिझर्व्ह बॅंकेने ज्याप्रमाणात तरतूद करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यापेक्षा अधिक तरतूद स्टेट बॅंकेने अनुत्पादक मालमत्तेपोटी केलेली आहे. त्याचबरोबर रोख्यावरील परतावा कमी होऊनही रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या मुदतवाढीचा लाभ आम्ही घेतलेला नाही. फारतर दुसऱ्या तिमाहीपर्यंत एनपीएचा नकारात्मक परिणाम संपुष्टात येईल व तिसऱ्या तिमाहीपासून बॅंकेला नफा होण्याची शक्‍यता आहे.
– रजनिश कुमार
अध्यक्ष, स्टेट बॅंक ऑफ इंडिया


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)