स्टेट बॅंकेच्या नफ्यात वाढ

मुंबई – सरलेल्या वर्षात आणि चौथ्या तिमाहीत स्टेट बॅंकेला अनुत्पादक मालमत्ता कमी करण्यात यश मिळाले आहे. यामुळे बॅंकेला कमी तूरतूद करावी लागली आहे. परिणामी स्टेट बॅंकेच्या चोथ्या तिमाहीतील नफ्यात 122 टक्‍क्‍याची वाढ होऊन तो 2814 कोटी रूपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बॅंकेला वाढलेल्या अदुत्पादक मालमत्तेमुळे केवळ 1263 कोटी रूपयाच्या नफ्यावर समाधान मानावे लागले होते.
अनुत्पादक मालमत्ता कमी होऊ लागल्यामुळे चौथ्या तिमाहीत बॅंकेला 11740 कोटी रूपयाची तरतूद करावी लागली आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत हि रक्कम 13174 कोटी रूपये इतकी होती. चौथ्या तिमाहीत बॅंकेची अनुत्पादक मालमत्ता कमी होऊन 6.90 टक्के झाली आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बॅंकेची अनुत्पादक मालमत्ता 7.23 टक्‍क्‍यावर गेली होती. बॅंकेने सरलेल्या वर्षासाठी प्रतिशेअर 2.60 रूपये एवढा लाभांश जाहीर केला आहे.
स्टेट बॅंकेसह भारतातील बहुतांश बॅंकाची अनुत्पादक मालमत्ता वाढल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र गेल्या सहा महिन्यात केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने अनुत्पादक मालमत्ता कमी व्हावी म्हणून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत.
त्यामुळे या तिमाहीत काही बॅंकानी नफा मिळविला आहे. आता आगामी काळात परिस्थिती आणखी सुधारण्याची शक्‍यता वाढली असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेच्या नफ्यात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे इतर बॅंकाच्या नफ्यातही आगामी काळात नफा वाढण्याची शक्‍यता खुली झाली असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. बॅंकेने आता आपल्या ठेवी आणि कर्जावरील व्याजदरात घट करण्यावर विचार सुरू केला आहे. गेल्या आठवठ्यात बॅंकेने कमी किमतीच्या कर्जावरील व्याजदरात बरीच कपात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)