स्टेट बँकेच्या व्याजदरात वाढ

नवी दिल्ली : स्टेट बँकेने एक आणि दोन वर्षे कालावधीच्या एक कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात पाव टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या शिवाय दोन ते तीन वर्षे कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरही अंशत: वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव व्याजदराची अंमलबजावणी २८ मे पासून करण्यात येणार आहे.

सर्वसामान्य ग्राहकांना एक ते दोन वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर यापूर्वी स्टेट बँकेतर्फे ६.४० टक्के व्याज देण्यात येत होते. त्यावर आता सुधारित व्याजदराप्रमाणे ६.६५ टक्के दराने व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी ६.९० टक्के दराने व्याज मिळत होते. मात्र, त्यांना आता ७.१५ टक्के दराने व्याज मिळणार आहे. दोन वर्षे ते तीन वर्षांपर्यंतच्या मुदतठेवींवर सर्वसामान्य ग्राहकांना ६.६५ टक्के दराने व्याज मिळणार आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना ७.१५ टक्के दराने व्याज मिळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)