स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा – ऑस्ट्रेलिया सरकार

मुंबई : चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलिया सरकारने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला (सीए) स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत चेंडूशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सीएने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेराने रंगेहाथ पकडले होते. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला. हे पूर्ण दृश्य टेलिव्हिजन कॅमेराने टिपल्याने बॅनक्रॉफ्टला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले.

सीए या सर्व प्रकरणाची चौकशी करणार आहे. स्टीव्ह स्मिथनेही आपली चूक मान्य केली आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया सरकारने स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. ही घटना धक्कादायक आणि निराशाजनक असल्याचं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांनी म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेतील बातम्या सकाळी-सकाळी पाहून दुःख झाले. ऑस्ट्रेलिया संघाच्या या प्रकारामुळे विश्वासाला तडा गेला असल्याचेही ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)