स्टीव्ह स्मिथची कर्णधारपदावरुन हकालपट्टी ; टीम पेनकडे संघाची धुरा

मेलबर्न : चेंडूशी छेडछाड करणे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला चांगलंच महागात पडले आहे. कारण  कर्णधारपदावरुन त्याची हकालपट्टी करण्यात आली. तसेच त्याच्यासोबतच उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरही पदावरुन पायउतार झाला. यष्टीरक्षक फलंदाज टीम पेनकडे संघाची धुरा देण्यात आली आहे.

या प्रकरणाची क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गंभीर दखल घेतली होती. स्टीव्ह स्मिथनेही ही चूक मान्य करत बॉल टेम्परिंग हा रणनितीचाच एक भाग होता, अशी स्पष्ट कबुली दिली होती. शिवाय माफीही मागितली. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत कठोर भूमिका घेत स्टीव्ह स्मिथला राजीनामा देण्यास भाग पाडले.

चेंडूशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर स्टीव्ह स्मिथने माफी मागितली. ”चेंडूशी छेडछाड केल्यामुळे आम्हाला फायदा होईल, असे वाटले होte. संघ व्यवस्थापनाला याची माहिती होती. मात्र प्रशिक्षकांचा यामध्ये सहभाग नाही. ही अभिमानाची गोष्ट नाही. माझ्या नेतृत्त्वात पुन्हा अशी चूक होणार नाही,” असे स्टीव्ह स्मिथ म्हणाला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)