स्टीव्ह वॉ सर्वात स्वार्थी खेळाडू शेन वॉर्नची “नो स्पिन’ या आत्मचरित्रामध्ये टीका

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू आणि महान लेग स्पिनर शेन वॉर्नने विश्‍वविजेत्या संघाचा कर्णधार स्टीव्ह वॉ अत्यंत स्वार्थी असल्याचे धक्‍कादायक विधान केले आहे. शेन वॉर्नने “नो स्पिन’ या आपल्या आत्मचरित्रामध्ये स्टीव्ह वॉ याच्यावर कडाडून टीका केली आहे. शेन वॉर्नचे आत्मचरित्र लवकरच प्रसिद्ध होणार असून आपल्या कर्णधारावर टीका केल्यामुळे हे आत्मचरित्र चर्चेत आहे.

स्टीव्ह वॉ हा सर्वात स्वार्थी खेळाडू आहे. फलंदाजी करताना आपली किमान 50 ची सरासरी कशी राहील याचीच त्याला कायम चिंता असायची, असा दावा शेन वॉर्नने आपल्या आत्मचरित्रामध्ये केला आहे. वॉर्नच्या या खळबळजनक दाव्यामुळे क्रिकेट वर्तुळात आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेटची जगभरात प्रतिमा डागाळल्याचा दावा वॉर्नने केला होता. त्यात स्टीव्ह वॉविरुद्घचा हा दावा आगीत तेल ओतण्यासारखा आहे.

-Ads-

वॉर्नने लिहिले आहे की, कर्णधारपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर वॉ माणूस म्हणून पूर्णपणे बदलला. त्याने मला संघातून डावलले म्हणून मी असे बोलत नाही. मी चांगली कामगिरी करत नसेन, तर मला संघात राहता येणार नाही. मात्र, तसेही नव्हते. तो माझ्या कामगिरीवर जळत होता. माझ्या शरीरयष्टीवरून तो सतत मला चिडवत होता. त्यावेळी मी त्याला तू तुझा विचार कर, असा सल्ला दिला होता.

स्टीव्ह वॉ याने 1999 च्या वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटी मालिकेतून शेन वॉर्नला वगळले होते, त्यावरही त्याने टिप्पणी केली आहे. तो म्हणतो, मी उपकर्णधार होतो, त्यावेळी माझी कामगिरीही चांगली होतो. पण, निवड समितीच्या बैठकीत तू पुढील कसोटीत खेळू शकत नाहीस, असे वॉने मला सांगितले होते. त्याचे कारण मला अद्याप समजले नाही. वैयक्तिक आयुष्य आणि एक खेळाडू म्हणून वेगळे रहायले होते. दोन्ही गोष्टींना एकत्र केल्यास त्याचा फटका संघाला बसतो.

माजी कसोटीपटू स्टीव्ह वॉ याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 1999 चा आयसीसी विश्वचषक उंचावला होता. विश्वविजेत्या संघाचा शेन वॉर्नही सदस्य होता. आपल्या कर्णधारावर अशी टिप्पणी केल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मात्र 53 वर्षीय स्टीव्ह वॉने यावर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)