स्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धा: पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद

पुणे: स्टार स्पोर्टस्‌ अकादमी यांच्या तर्फे आयोजीत स्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाने क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले आहे.

स्टार स्पोर्टस्‌ अकादमी क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत मिहिर देशमुखच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 5 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. पहिल्यांदा खेळताना पार्थ शेवाळे व साईराज चोरगे यांच्या अचूक गोलंदाजीपुढे क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघ 44 षटकांत सर्वबाद 151 धावांत गारद झाला. पीवायसी हिंदू जिमखाना संघाच्या पार्थ शेवाळे व साईराज चोरगे यांनी प्रत्येकी 2 तर रोहित कांबळे, सय्यद सुफियान व मिहिर देशमुख यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. 151 धावांचे लक्ष मिहिर देशमुखच्या नाबाद 70 धावांच्या बळावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 41 षटकांत 4 बाद 155 धावांसह पुर्ण करत विजेतेपद पटकावले. यात समर्थ काळभोरने 17 तर रोहित कांबळेने 16 धावा करून मिहिरला सुरेख साथ दिली. नाबाद 70 धावा व 1 गडी बाद करणारा मिहिर देशमुख सामनावीर ठरला.

पीवायसी हिंदू जिमखाना संघा संघाचा मिहिर देशमुख मालिकावीर तसेच सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला तर क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाचा साईराज चोरगे सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक –

क्‍लब ऑफ महाराष्ट्र – 44 षटकांत सर्वबाद 151 (गिरिष शहापुरकर 37, प्रणव केळकर 25, विवेक टिपरे 20, पार्थ शेवाळे 2-31, साईराज चोरगे 2-16, रोहित कांबळे 1-5, सय्यद सुफियान 1-7, मिहिर देशमुख 1-37) पराभूत वि पीवायसी हिंदू जिमखाना- 41 षटकांत 4 बाद 155 धावा (मिहिर देशमुख नाबाद 70, समर्थ काळभोर 17, रोहित कांबळे 16, हितेश यादव 1-22, अथर्व जयहर 1-21, पार्थ कांबळे 1-35, साहिल कड 1-29) सामनावीर- मिहिर देशमुख.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)