स्टार प्रवाहवर पाहा ‘तुझं तू माझं मी’

प्रेम आणि लग्न हा विषय चित्रपटांसाठी नेहमीच एव्हरग्रीन असतो. या विषयाचे नवनवे कंगोरे चित्रपटांतून बघायला मिळतात. ‘टीटीएमएम – तुझं तू माझं मी’ या चित्रपटातून प्रेम आणि लग्न या विषयावर हलक्याफुलक्या पद्धतीनं भाष्य करण्यात आलं आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला हा चित्रपट स्टार प्रवाहवर 1 जुलैला रविवारी वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरद्वारे पहायला मिळणार आहे.

लग्न करायचं नाही असं ठरवून जय आणि राजश्री घरातून पळून जातात आणि योगायोगानं सहप्रवासी होतात. पुण्यातून सुरू झालेला प्रवास गोव्यापर्यंत येऊन पोहोचतो आणि पुण्यात जाऊनच संपतो. या प्रवासादरम्यान त्या दोघांमध्ये काय घडतं याचं मजेशीर चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. प्रेम, विवाहसंस्था, नातेसंबंध, कुटुंब या विषयावर हा चित्रपट तरुणाईच्या दृष्टीनं भाष्य करतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)