स्टार प्रवाहवर नवे वस्ताद!

सुयश टिळक आणि आस्ताद काळे हे सुप्रसिद्ध कलाकार लवकरच स्टार प्रवाहच्या परिवारात पुन्हा सामील होणार आहेत. ‘छोटी मालकीण’ या मालिकेतून सुयश टिळक आणि नकळत सारे घडले या मालिकेतून आस्ताद काळे लवकरच धमाकेदार एण्ट्री करणार आहेत. या दोघांचंही आजवर न पाहिलेलं रुप या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

‘छोटी मालकीण’ या मालिकेत सुयश टिळक सुरेश ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. आजवर सुयशला आपण चॉकलेट हिरोच्या भूमिकांमध्ये पाहिलंय पण ‘छोटी मालकीण’मधील भूमिका सुयशच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आणि हटके असणार आहे. याआधी स्टार प्रवाहच्या पुढचं पाऊल, दुर्वा, बंध रेशमाचे आणि देवयानी या मालिकांमधून सुयश झळकला होता. त्यामुळे छोटी मालकीणमधल्या भूमिकेसाठी तो खूपच एक्सायटेड आहे. ‘स्टार प्रवाहच्या कुटुंबात पुन्हा एकदा सामील होत असल्याचा आनंद तर आहेच शिवाय नव्या वर्षात नवं काहीतरी करायला मिळतंय हे जास्त सुखावणारं आहे. प्रेक्षकांनी आजवर माझ्या सर्वच मालिकांवर भरभरुन प्रेम केलंय. त्यामुळे छोटी मालकीणमधील ही भूमिका आणि मालिकेत येणारं नवं वळण प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे.’ अशी भावना सुयश टिळकने व्यक्त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आस्ताद काळेचेही स्टार प्रवाहसोबत जुने ऋणानुबंध आहेत. स्टार प्रवाहच्या पुढचं पाऊल या मालिकेत त्याने प्रमुख व्यक्तिरेखा साकारली होती. नकळत सारे घडले या मालिकेतील त्याची व्यक्तिरेखा खूपच खास आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातला, साधासरळ, आईची सेवा करणारा असा आदर्श मुलगा तो या मालिकेत साकारणार आहे.

सुयश आणि आस्तादच्या एण्ट्रीने ‘छोटी मालकीण’ आणि ‘नकळत सारे घडले’ या दोन्ही मालिकांच्या कथानकाला नवी कलाटणी मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)