स्टार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा 2018 : व्हिजन ऍकॅडमीचा 32 धावांनी विजय 

पुणे: येथे सुरु असलेल्या स्टार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत साखळी सामन्यात संकेत भगतच्या धदाकेबाज फलंदाजी नंतर अजिंक्‍य तुलपुळेच्या भेदक गोलंदाजीच्या बलावर व्हिजन क्रिकेट ऍकॅडमीने क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या संघाचा 32 धावांनी पराभव करताना स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना व्हिजनच्या संघाने 41 षटकांत सर्वबाद 171 धावा करताना क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या संघासमोर विजयासाठी 172 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात खेळणाऱ्या क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या संघाला 38 षटकांत सर्वबाद 139 धावांचीच मजल मारता आल्याने त्यांना 32 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरलेल्या क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या संघाची सुरुवात खराब झाली. त्यांचा सलामीवीर सुरज परदेशी एकही धाव न करता तंबूत परतला. तर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेला कन्हैया लड्डा देखिल केवल 12 धावांवर परतला. तर, मधल्या फळीतील फलंदाज कृष्णा गवळी आणि मुकुल यादव अनुक्रमे 6 आणि 3 धावा करुन परतल्याने त्यांचा संघ चांगलाच अदचणीत सापडला.

यावेळी त्यांचा दुसरा सलामीवीर राज उंद्रेने विराज दारवटकरच्या साथीत संघाचा दाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनीही संघाला शंभरी उलटून दिल्यानंतर लागलीच राज 57 धावांवर असताना बाद झाला. तर त्यानंतरचे त्यांचे फलंदाज केवल हजेरीवीर ठरल्याने त्यांना केवळ 139 धवाच करता आल्याने त्यांचा 32 धावाम्नी पराभव झाला. यावेळी विराजने नाबाद 28 धावांची खेळी करताना संघाचा पराभव काहिसा लांबवला.

तत्पूर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना व्हिजनचे सलामीवीर आकाश पाटिल आणि संकेत भगतयांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. यावेळी आकाशने 40 चेंडूंचा सामना करताना 36 धावांची सलामी दिली. तर, संकेत भगतने 59 धावांची खेळी करत संघाला शंभरी पार करुन दिली. यावेळी हे दोघेही बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यांच्या 5 फलंदाजांना दुहेरी आकदाही गाठता आला नाही. मात्र, गौरव शिंदे आणि साहिल कोहिनकरयांनी थोदाफार प्रतिकार करत संघाला 171 धावांपर्यंत मजल मारून दिली. यावेळी अतिरीक्त असलेल्या 19 धावा त्यांच्या कडून तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावा होत्या.

संक्षिप्त धावफलक – 
व्हिजन क्रिकेट ऍकॅडमी 41 षटकांत सर्वबाद 171 (संकेत भगत 59, आकाश पाटिल 36, गौरव शिंदे 15, कन्हैय्या लड्डा 38-4, शुभम मैड 11-4)विजयी विरुद्ध क्‍लब ऑफ महाराष्ट्र 38 षटकांत सर्वबाद 139 (राज उंद्रे 57, विराज दारवटकर 28, अजिंक्‍य तुळपुले 30-3, विराज हझारे 27-2).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)