स्टार्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा: स्टार्सचा व्हिजन क्रिकेट ऍकॅडमीवर दणदणीत विजय

पुणे: येथे सुरु असलेल्या स्टार्स क्रिकेट ऍकॅडमीने आयोजीत केलेल्या 45 षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात स्टार्स संघाने जयराज दिवान आणि शुभंकर हार्डिकरच्या फलंदाजीच्या बळावर व्हिजन क्रिकेट ऍकॅडमीचा 6 गडी आणि 19 चेंडू राखून पराभव करताना स्पर्धेत विजयी आगेकूच केली.

नाणेफेक गमावून व्हिजन संघाने प्रथम फलंदाजी करताना 44.2 षटकांत 234 धावांची मजल मारताना स्टार्स संघसमोर विजयासाठी 235 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना स्टार्स संघाने हे आव्हान 41.5 षटकांत केवळ चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्न करत मालिकेत विजयी आगेकूच नोंदवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी प्रत्युत्तरात फलंदाजीस उतरलेल्या स्टार्सच्या संघाने दमदार फलंदाजी केली. यावेळी त्यांचे सलामीवीर प्रतिक पवार आणि सौरभ देवगुंडेयांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. प्रतिकने 42 चेंडूत 28 धावांची खेळी केली तर सौरभने 32 चेंडूत 20 धावा केल्या. यावेळी दोघेही बाद झाल्यानंतर फलंदाजीस आलेल्या जयराज दिवान आणि शुभंकर हार्डिकरने सावध फलंदाजी करत संघाचा डाव सावरायला सुरुवात केली. यावेळी जयराजने सावध परंतू तितकीच महत्वपूर्न फलंदाजी करत 96 चेंडूत 80 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलताना सामनावीराचा पुरस्कारही आपल्या नावे केला. तर, शुभंकरने 53 चेंडूत 53 चेंडूत 39 धावांची खेळी करताना 39 धावांची महत्वपूर्ण खेळी करत त्याला सुरेख साथ दिली. हे दोघे बाद झाल्यानंतर अभिषेक बोधे आणि सूरज जाधवयांनी संघाच्या विजयावर शिक्‍का मोर्तब केला. यावेळी अभिषेकने 29 चेंडूत 32 धावांची खेळी केली. तर, सूरजने 7 चेंडूत 17 धावांची वेगवान खेळी साकारली. यावेळी व्हिजन कडून विराज हझारे, प्रताप जोरी आणि प्रखर अग्रवालने प्रत्येकी एक बळी मिळवला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना व्हिजन क्रिकेट ऍकॅडमीने निखिल जोशीचे शतक आणि गौरव शिदेच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर 44.2 षटकांत 234 धावांपर्यंत मजल मारली. यावेळी व्हिजनची सुरुवात खराब झाली. त्यांचे सलामीवीर आकाश पाटिल आणि संकेत भगत अनुक्रमे 19 आणि 10 धावा करुन मागारी परतली. दोन्ही सलामीवीर लवकर परतल्यानंतर आलेल्या गौरव शिंदे आणि निखील जोशीयांनी सावध फलंदाजी करत संघाचा दाव सावरायला सुरुवात केली. यावेळी गौरव शिंदेने फटकेबाजी करताना 54 चेंडूत 61 धावांची दमदार फलंदाजी केली. तर, निखिल जोशीने 97 चेंडूत 103 धावाम्ची खेळी करत दमदार शतक झळकावले. दोघे बाद झाल्यानंतर आलेल्या प्रखर अग्रवालने अखेरच्या षटकांमध्ये संघाचा डाव सावरताना संघाला 234 धावांची मजल मारून दिली.

संक्षिप्त धावफलक –
व्हिजन क्रिकेट ऍकॅडमी – 44.2 षटकांत सर्वबाद 234 (निखिल जोशी 103, गौरव शिंदे 61, प्रखर अग्रवाल 15, निचिकेत वेर्लेकर 53-4, हार्दिक अडक 17-3), पराभुत विरुद्ध स्टार्स क्रिकेट ऍकॅडमी 41.5 षटकांत 4 बाद 236 (जयराज दिवान 80, शुभंकर हार्डिकर 39, अधिशेक बोधे नाबाद 32, प्रताप जोरी 29-1).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)