स्टार्टअप विकसित करण्यासाठी मुंबई शेअरबाजाराचा पुढाकार

मुंबई, नव्या पिढीतील कंपन्या असणाऱ्या स्टार्टअपसाठी भांडवली बाजारात सूचीबद्ध होताना अधिक आकर्षक होण्यासाठी बीएसईकडून नवीन प्लॅटफॉर्म पुढील महिन्यात सादर करण्यात येणार आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये आयटी, आयटीईएस, बायो-टेक, लाईफ सायन्स, 3डी प्रिंटिंग, अवकाश तंत्रज्ञान आणि ई व्यापार क्षेत्रातील कंपन्यांना यामध्ये सूचीबद्ध होण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त उच्च तंत्रज्ञानयुक्त संरक्षण, ड्रोन्स, नॅनो तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा, व्हर्च्युअल रिअल्टी, ई गेमिंग, रोबोटिक्‍स, गेनेटिक इंजिनिअरिंग या क्षेत्रांना निधी उभारण्यास मदत होईल.

9 जुलै रोजी हा प्लॅटफॉर्म सादर करण्यात येणार असून बीएसईच्या अल्प आणि मध्यम उपक्रम क्षेत्रांतर्गत असेल. या प्लॅटफॉर्ममध्ये नोंदणी होण्यासाठी कंपन्यांनी किमान 1 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री करणे आवश्‍यक आहे. बीएसईकडे नोंदणी करण्यासाठी कंपनीला किमान तीन वर्षे पूर्ण होणे आवश्‍यक आहे. कंपनीकडे काही प्रमाणात संपत्ती असणे आवश्‍यक आहे. कंपन्यांकडे किमान दोन वर्षांचा संस्थांत्मक गुंतवणूकदार, एन्जल इन्व्हेस्टर्स असणे गरजेचे आहे. याचप्रमाणे नादारी आणि दिवाळखोरी कायद्यांतर्गत कंपनीने राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे अर्ज केलेला असता कामा नये. चालू महिन्याच्या सुरुवातीला स्टार्टअप कंपन्यांसाठी बाजारात सूचीबद्ध होत निधी उभारण्यासाठी सेबीकडून समितीची स्थापना करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)