स्टर्लिंग बायोटेकने बुडवले 8100 कोटींचे कर्ज 

ईडीने दाखल केले प्रकरण; कंपनीचे संचालक झाले फरारी 

नवी दिल्ली: गुजरातमधील स्टर्लिंग बायोटेक उद्योग समुहाने 8100 कोटी रूपयांचा कर्ज घोटाळा केला आहे. ही बाब ईडीच्या तपासातही स्पष्ट झाली असून ईडीने विशेष कोर्टात अर्ज दाखल करून कंपनीच्या संचालकांना फरारी घोषित करून कारवाईची अनुमती मागितली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कंपनीचे मालक नितीन संदेशरा, चेतन संदेशरा, दिलीप संदेशरा, आणि हितेश पटेल यांना फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यासाठी नवीन कायद्यानुसार अर्ज केला आहे. हे चारही संचालक देश सोडून फरारी झाले आहेत. त्यांनी भ्रष्ट मार्गाने सरकारी बॅंकांकडून 8 हजार 100 कोटी रूपयांचे कर्ज घेतले असल्याचे सारे पुरावे ईडीला मिळाले आहेत.

दरम्यानच्या काळात आपल्यावरील कारवाईच्या भीतीने चारही कंपनी संचालक देश सोडून पळून गेले आहेत यातील तीन संदेशरा हे नायजेरीयात तर पटेल अमेरिकेत पळून गेला आहे. त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न ईडीने सुरू केले आहेत अशीही माहिती उपलब्ध झाली आहे. ज्या कायद्यान्वये विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे त्याच कायद्यानवे स्टर्लिंग बायोटेक कंपनीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)