तुतिकोरिन (तामिळनाडू) – वेदान्ताच्या स्टरलाईट कॉपर उद्योगाविरोधात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. आंदोलकांकडून हिंसेचा मार्ग अवलंबला गेल्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये 9 आंदोलकांचा मृत्यू झाला.

आंदोलकांना कंपनीच्या दिशेने जाऊ देण्यास मज्जाव केल्यावर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि पोलिसांच्या वाहनांची नासधूस केली. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशावरून स्टरलाईट कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांकडून मार्गात अडथळे उभे केले गेले तरी संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करत सुरक्षा रक्षकांना ढकलून पुढे घुसण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती हाताबाहेर जायची चिन्हे दिसायला लागल्यावर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या दगडफेकीमध्ये 20 जण किरकोळ जखमी झाले. काही वाहनांना आगी लावल्यामुळे दंगलसदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली.

दरम्यान स्टरलाईट उद्योगाच्या प्रस्तावित विस्तारीकरणाला विरोध करण्यासाठी बस स्थानकाच्या परिसरात अन्य गटाने शांततेने निदर्शने केली. हा उद्योग प्रकल्प बंद करण्यात यावा, यासाठी गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरू आहे. तुतिकोरिनमधील या प्रकल्पामध्ये दरवर्षी 4 लाख टन कच्च्या तांब्यावर प्रक्रिया केली जाते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)