‘स्टरलाइट कॉपर’ बंद झाल्याने ५० हजार लोकांवर बेरोजगारीचे संकट

चेन्नई : तामिळनाडूतील तुतिकोरीन येथील वेदांत समूहाच्या स्टरलाइट कॉपर या कंपनीचा तांबेनिर्मिती प्रकल्प बंद करण्याचे आदेश तेथील राज्य सरकारने दिले असून याचा फटका देशभरातील ८०० लघु व मध्यम उद्योगांना बसणार आहे. या निर्णयामुळे या क्षेत्राशी संबंधित उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या ५० हजार लोकांच्या रोजगारावर संकट आले आहे. या प्रकल्पातून वर्षाला ४ लाख टन तांबेनिर्मिती व्हायची. देशभरात दरवर्षी १० लाख टन तांबेनिर्मिती होते. म्हणजेच देशातील तांब्याच्या उत्पादनात तुतिकोरीन प्रकल्पाचा वाटा ४० टक्के इतका होता.

तांब्याचा वापर प्रामुख्याने इलेक्ट्रीकल सेक्टरमध्ये होतो. वायर आणि ट्रान्सफॉर्मरसाठी तांब्याचा वापर केला जातो. इलेक्ट्रीकल सेक्टरमधील पश्चिम आणि उत्तर भारतातील जवळपास ८०० लघु आणि मध्यम उद्योग तुतिकोरीन प्रकल्पावर अवलंबून होती. आता हा प्रकल्पच बंद झाल्याने जवळपास ५० हजार लोकांच्या रोजगारावर संकट आले आहे, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)