स्टंट करताना भारती सिंहला लागली धाप

स्टंट रिलिटी शो ‘खतरों के खिलाडी-9’ मध्ये एका स्टंटदरम्यान, कॉमेडियन भारती सिंहला वॉटर स्टंटवेळी अचानक धाप लागली. तिला दम्याचा त्रास आहे. पाण्यात जाताच तिला थोडी भीती वाटायला लागली. परिणामी तिच्या दम्याच्या आजाराने डोके वर काढले आणि तिला अस्थमाचा अॅटॅक आला.

भारती आणि शमिता शेट्टीला हे वॉटर स्टंट करायच होते. यादरम्यान, भारतीला अस्थमा अॅटॅक आला. भारतीने टास्क मध्येच सोडले. तिची तब्येत बिघडली. तिला इनहेलर देण्यात आले. तरीही भारतीच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. मग तिला ऑक्‍सिजन मास्क लावण्यात आले. भारतीची तब्येत बिघडल्याने इतर कंटेस्टेंट्‌सदेखील घाबरले. भारतीच्या डोळ्यातून सातत्याने पाणी येत होते. कॉमेडियन भारतीचा पती हर्ष लिंबाचियादेखील शोचा स्पर्धक होता. आता तो या शोतून बाहेर पडला आहे. हर्ष शो मधून बाहेर झाल्यानंतर भारती खूपच भावूक झाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता हे दोघेही पती पत्नी आणखी एका स्टंट बेस रिअॅलिटी शो मध्ये सहभागी होणार आहेत, असे समजते आहे. “खतरा, खतरा, खतरा’असे या रिअॅलिटी शो चे नाव आहे. हर्षने या कार्यक्रमाचे कार्यकारी निर्माता बनण्याचे मान्य केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती करणार आहे. अत्यंत विनोदी पद्धतीने स्टंट आणि अॅडव्हेंचर स्टंट करण्याच्या या शो चे शुटिंग दिल्ली, मुंबई आणि आग्रामध्ये होणार आहे. या कार्यक्रमातही भारती स्टंट करणार आहे की नाही, हे समजले नाही. पण आताच्या अनुभवाच्या आधारे ती कदाचित असे स्टंट करण्याच्या भानगडीत पडणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)