“स्कॉलरशिप’च्या आमिषाने गंडा

पिंपरी – स्कॉलरशिप बॅंक खात्यात जमा होणार असल्याची बतावणी करत खात्याची माहिती विचारून तरुणीची 80 हजारांची फसवणूक केली. ही घटना हिंजवडी येथे घडली.

हर्षिता प्रदीप माहेश्वरी (वय-24, रा. हिंजवडी, मूळ गाव मध्य प्रदेश) असे तरुणीचे नाव आहे. हर्षिता यांना अज्ञात व्यक्‍तीने फोन करून एमपी बोर्ड स्टेट स्कॉलरशिप मिळाल्याचे सांगितले; तसेच रक्कम बॅंक खात्यात जमा करण्यासाठी हर्षिता यांना बॅंक खात्याची माहिती विचारली. त्यानंतर बॅंकेकडून आलेला ओटीपी क्रमांकही विचारला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हर्षिता यांनी दिलेल्या माहितीचा गैरवापर करत चोरट्याने त्यांच्या खात्यातील 80 हजार रुपये ऑनलाइन हस्तांतर केले. सहायक पोलीस निरीक्षक एन. एस. न्यामणे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)