स्कॉर्पिओच्या घडकेने सायकलस्वाराचा मृत्यू

लोणी काळभोर-पुणे – सोलापूर महामार्गावर ऊरूळी कांचन परिसरात सायकलवरून चाललेल्या एकास स्कॉर्पिओने मागून धडक दिल्याने सायकलस्वार मृत्युमुखी पडला असल्याची घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
मारूती शिवराम कांबळे (वय 55, रा. एंजल हायस्कूल नजीक, ऊरूळी कांचन) असे मृत्यूमुखी पडलेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा संतोष मारूती कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मारूती कांबळे हे घरानजीक किराणा मालाचे दुकान चालवतात. त्याचे खरेदीसाठी ते ऊरूळी कांचन गावात चालले होते. कांबळे हे सायकलवरून श्रीकृष्ण मंगल कार्यालयानजीक असलेल्या मुळा – मुठा कालव्याच्या पोटचारीच्या कोपऱ्याजवळ आले असता मागील बाजूने स्कॉर्पिओ जीप (एमएच 42 के 0525) भरधांव वेगाने आली. तिने सायकलला धडक दिली व न थांबता सोलापूर बाजूकडे निघून गेली. या धडकेत मारूती कांबळे हे महामार्गावर आपटले. त्यामुळे त्यांच्या डोक्‍यास व इतरत्र गंभीर जखमा झाल्या. त्यांना तातडीने संतोष कांबळे यांनी इतरांच्या मदतीने नजीकच्या चिंतामणी रूग्णालयात नेले; मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)