स्कॉर्पिओची काच फोडून तीन लाख लुटले

चाकण- येथील आंबेठाण चौकातील राजगुरूनगर सहकारी बॅंकेसमोर देशमुखवाडीच्या सारपंचांच्या स्कॉर्पिओ गाडीची काच फोडून तीन लाख रुपये चोरट्यांनी चोरून नेले असल्याची माहिती ठाणे अंमलदार रामचंद्र कुंभार यांनी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 7) दुपारी 12च्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद देशमुखवाडीचे सरपंच संजय ज्ञानेश्‍वर देशमुख (वय 46, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली. देशमुख यांनी ट्रक विकून आणलेले तीन लाख रुपये स्कॉर्पिओ गाडी (एमएच 14 डीआर 7172) मध्ये पिशवीत ठेवून ते बॅंकेत धनादेश भरण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून त्यांच्या गाडीची काच फोडली व पैशाची बॅग घेऊन पोबारा केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे हे पुढील तपास करीत आहेत. राजगुरूनगर बॅंकेसमोर सातत्याने रोख रक्कम लुटण्याच्या घटना घडत असल्याने ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही भरदिवसा बॅंकेच्या आवारात लुटीच्या घटना घडल्या असून बॅंकेचा रखवालदार असून नसल्यासारखे आहे. त्यातच बॅंकेची सीसीटीव्ही यंत्रणा मोजक्‍या अंतरापर्यंत कव्हर करीत असल्याने चोरट्यांच्या टोळीचे चांगलेच फावले आहे. त्यामुळे या घटना सातत्याने वाढत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)