स्केटिंग ग्राऊंडच्या कामाला गती द्या!

पिंपरी – महापालिकेतर्फे विकसित करण्यात येणाऱ्या भोसरी, इंद्रायणीनगर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्केटिंग ग्राऊंडचे काम वेगात करा. खेळाडूंना ट्रॅक उपलब्ध करुन देण्यात यावा. पहिल्या टप्प्याचे काम नोव्हेंबर अखेर पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश आमदार महेश लांडगे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

महापालिकेतर्फे भोसरी, इंद्रायणीनगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग ग्राऊंड विकसित करण्यात येत आहे. वर्षभरापासून त्याचे काम सुरु आहे. आमदार महेश लांडगे यांनी बुधवारी (दि.2 6)पालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत कामाची पाहणी केली. यावेळी नगरसेविका नम्रता लोंढे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, उपअभियंता विजय वाईकर, कनिष्ठ अभियंता राहुल जन्नू, निलेश केदार, वास्तूविशारद पंकज कांबळे, राहुल राणे, योगेश कुमावत, ठेकेदार आनंद निकुंभ, मंदार कुलकर्णी उपस्थित होते.

-Ads-

आमदार लांडगे म्हणाले, इंद्रायणीनगर येथील ग्राऊंड हे शहरातील पहिलेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग ग्राऊंड असणार आहे. त्याचे काम दर्जेदार करण्यात यावे. कामाला वेग देण्यात यावा. खेळाडूंना वेळेत ग्राऊंड उपलब्ध झाले पाहिजे. सीमाभिंतीलगत चोहोबाजूकडून उंच झाडे लावण्यात यावीत. स्केटिंग रिंगचे कोटींग करण्यात यावे. तसेच नावीन्यपूर्णतेच्या उद्देशाने काही सुविधा देण्यात याव्यात. पहिल्या टप्प्याचे काम नोव्हेबर अखेर पूर्ण होईल, त्यादृष्टीने काम करण्यात यावे. जेणेकरुन दिवाळीमध्ये खेळांडूंना ट्रॅक उपलब्ध होईल. विविध स्पर्धा घेण्यात येतील, अशा सूचना आमदार लांडगे यांनी दिल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)