स्कूल बस-इनोव्हाच्या अपघातात एकजण जखमी

पिंपरी – रावेत येथील बास्केट ब्रीज जवळ इनोव्हा व स्कूल बसचा शनिवारी (दि. 4) सकाळी दहाच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये इनोव्हा मधील एकजण किरकोळ जखमी झाला आहे.

औंध-रावेत बीआरटी मार्गावर खासगी शाळेची बस डांगे चौकातून रावेतच्या दिशेने निघाली होती. तिच्याविरुद्ध दिशेने इन्होवा (एमएच 04, ईक्‍यू 7146) येत होती. यावेळी इनोव्हा चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व इनोव्हा बीआरटीएसच्या कठड्याला जाऊन धडकली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामध्ये सुदैवाने बस मधील कोणालाही दुखापत झाली नसून. या अपघातात इनोव्हा कारचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनास्थळी वाहतूक व स्थानिक पोलीस पोहचले व त्यांनी वाहतूक पुन्हा पूर्ववत केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)