“स्किल डेव्हलपमेंट’ कार्यालयास संभाजी पाटील-निलंगेकरांची भेट

चिखली – युवा शक्ती फाउंडेशनच्या स्किल डेव्हलपमेंट कार्यालयास राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी चिखली येथील पूर्णानगर येथे नुकतीच भेट दिली.

संस्थेचे अध्यक्ष तथा सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. संचालक विक्रमादित्य पवार, ऐश्वर्या पवार, सतिश पवार आदी उपस्थित होते. युवाशक्ती फाउंडेशन ग्रुप गेल्या दहा वर्षापासून सांस्कृतिक मनुष्यबळ सेवा, ट्रेनिंग तसेच प्रशिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे.

ग्रामीण शहरी भागातील तरुण वर्गाला रोजगार कौशल्य प्रशिक्षण व नोकरी मार्गदर्शन प्रदान करणे व व्यावसायिक विकासावर प्रशिक्षण देणे या माध्यमातून युवाशक्ती फाउंडेशन काम करत आहे. संस्थेच्या महाराष्ट्र तसेच भारतात इतर राज्यात एकूण 12 शाखांच्या माध्यमातून रोजगार व कौशल्य विकासावर आधारित उपक्रम चालू आहेत. कमवा व शिका ही महाराष्ट्र राज्याची योजना तसेच मनुष्यबळ विकास मंत्रालय यांची राष्ट्रीय क्षमता वृद्धी मिशनच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन दिला जातो, अशी माहिती एकनाथ पवार यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)