स्किझोफ्रिनिया आजार म्हणजे काय?

स्किझोफ्रिनिया हा मानसिक आजार असून तो मेंदूचा विकारही आहे. मेंदूतील डोपामिन’ या रसायनाची मात्रा कमी झाल्याने हा विकार होतो. सिटोटोनिन’ या रसायनाची मात्राही या विकारात बदलते. माणसाचे विचार, भावना व वागणूक यांच्या सुसंगतीवर अवलंबून असते. पण स्किझोफ्रिनियात या तीन मुख्य गोष्टींमध्ये दोष निर्माण होतो. त्याच्या वास्तवाशी संबंध तुटतो व ते स्वत: आपल्याभोवती कुंपण घालतात.

जेणेकरून या कुंपण्याच्या आत-बाहेरील कोणतीही व्यक्ती येऊ नये असे त्यांची धारणा असते. अशाप्रकारे अन्य व्यक्‍तींच्या तुलनेत या व्यक्‍ती अत्यंत विचित्र वागतात. आपण विचारतो एक ते उत्तर देतात दुसरेच, अशी अवस्था असते. त्यांच्या वागण्या-बोलण्यातले तारतम्य व समतोलपणा बिघडलेला असतो. आपण या जगात वावरताना आपले वेगळे अस्तित्व सामावून सामाजिक भान ठेवतो ते नेमके या व्यक्‍तीना जमत नाही.

लक्षणे : वागण्यात दिसणारे बदल- स्वत:शीच हसणे व बोलणे, उगाचच हातवारे करणे, भटकत राहणे, आरोग्याबाबत बेफिकीर राहणे, अस्वच्छ राहणे, आक्रमक होणे.

भावनिक बदल- परिस्थितीशी जुळवून न घेणे, चेहऱ्यावर वेडेपणाचा भाव, भावनांचा अनुभव स्वत:लाच जाणवत नाही, संशयी वृत्ती.

विचारांमधील बदल- विचारात सुसूत्रता नसणे, दोन वाक्‍यात वा कल्पनेत कुठलाच तर्कशुद्ध संबंध नसणे, बोलण्याचा अर्थ न समजणे.

मानसिक आजाराचे अनेक प्रकार असतात. एखादा मोठा धक्‍का सहन न झाल्याने अनेकदा रुग्ण मानसिक दडपणाखाली जातो. यावर वेळीच उपचार झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. सर्वसामान्य व्यक्‍तीप्रमाणेच त्यांची वागणूक असल्याने अनेकदा कुटुंबात एकत्र राहणारी व्यक्‍ती मानसिक रोगी असल्याचे पटकन कळून येत नाही. पण तसेच काही घडल्यास या व्यक्‍ती समोर येतात. त्याचप्रमाणे, स्किझोफ्रिनिया’ची लक्षणे असणारे लोक अत्यंत संशयी प्रवृत्तीचे असतात. त्या कोणत्याही व्यक्‍तींवर सहजा विश्‍वास ठेवू शकत नाही. ही मंडळी माझे चांगले झालेलं पाहू शकत नाहीत. आपलं वाईट व्हावे यासाठी त्या काहीही करू शकतात. प्रसंगी आपला घातही करतील, अशी भीती सतत त्यांच्या मनात घर करून राहिलेली असते. स्वत:ला वाचवण्यासाठी ते हिंसक बनतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)