स्काऊट गाईड संघनायकांनी नेतृत्त्वाचे धडे गिरवले

कार्ला – पुणे भारत स्काऊट गाईड आयोजित मावळ तालुका स्काऊट गाईड संघनायक प्रशिक्षण शिबीर 26 सप्टेंबरला लोणावळा येथील व्ही. पी. एस्‌. हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित केले होते. तळेगाव येथून इंद्रायणी इंग्लिश स्कूल, आदर्श विद्या मंदिर, मामासाहेब खांडगे इंग्लिश स्कूल, प्रगती विद्या मंदिर-इंदोरी, न्यू इंग्लिश स्कूल-चांदखेड, न्यू इंग्लिश स्कूल- वडगाव आणि लोणावळा शहरातील व्ही. पी. एस. हायस्कूल, आंतर भारती बालग्राम, ऑक्‍झिलियम कॉन्व्हेंट, डॉन बॉस्को हायस्कूल, नागनाथ विद्यालय औंढे, लोनप माध्य. खंडाळा, लोनप उर्दू माध्यमिक व लोनप प्राथमिक विद्यालये इ. पंधरा विद्यालयांतील 260 स्काऊट गाईड मुला-मुलींनी प्रशिक्षणात नेतृत्त्वाचे धडे गिरवले. नेतृत्त्वासाठी आवश्‍यक गुण, कौशल्ये, क्षमता व ज्ञान इत्यादीचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. लोनप प्रशासन अधिकारी सुजाता देशमाने, व्ही. पी. एस. चे प्राचार्य सुधींद्र देशपांडे व पुणे भारत स्काऊट गाईड सह सचिव सरला भोसले यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
सहाय्यक जिल्हा आयुक्‍त व शिबीर प्रमुख विजय जोरी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नप्रभा गायकवाड, शीतल भोसले, वृषाली खोजरे, सुप्रिया हिंगे, यशश्री काजळे, प्रतिक्षा ढवळे, संजय पालवे, विशाल मोरे, संजय शिंदे, माऊली हिरवे, देवराम पारिठे, साहेबराव चव्हाण यांनी प्रशिक्षण दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)