सौ. ताराबाई मोहिते म्हणजे संस्काराचे विद्यापीठ : भोसले

कराड – सौ. ताराबाई मोहिते आईसाहेब या संस्कारांचे विद्यापीठच होत्या. त्यांनी 100 वर्षांपूर्वी केलेल्या संस्कारांच्या पेरणीमुळेच भाऊ-आप्पांनी आपले जीवन समाजासाठी समर्पित केले, असे प्रतिपादन कृष्णा अभिमत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी केले.

सौ. ताराबाई मोहिते यांच्या 118 व्या जयंतीनिमित्त रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, मधुकर यादव, बालाजी जाधव, शामबाला घोडके, यु. जे. साळुंखे, सुवर्णा कापूरकर, संजय पवार, विक्रमसिंह मोहिते, व्ही. के. मोहिते, शिवाजीराव चव्हाण, जयवंतराव साळुंखे, वसंतराव घोडके, फटेशपापा मोहिते, हणमंतराव धर्मे, हेमंत धर्मे, भास्कर पवार, सुनिल पवार, बाळकृष्ण कदम, प्रतापराव साळुंखे, चंद्रकांत सूर्यवंशी, राहुल मोहिते, एस. पी. सावंत उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विनायक भोसले म्हणाले, आई आणि शिक्षक हे दोन लोक मुलांवर संस्कार करत असतात. ते ज्या पद्धतीचे संस्कार करतील, तशी पिढी घडत असते. त्यामुळे आईकडून होणारे संस्कार हे अत्यंत महत्वपूर्ण असतात. ताराबाई मोहिते यांच्या संस्कारामुळे भाऊ – आप्पा नेहमी समाजकार्यात अग्रेसर राहिले.

मदनराव मोहिते म्हणाले, आईसाहेबांनी खडतर परिस्थितीत मोहिते कुटुंबाला भक्कम आधार मिळवून दिला. त्यांच्या प्रगतिशील विचारांमुळेच भाऊ-आप्पांनी या भागाचे नंदनवन केले. यावेळी ग्रंथालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. हेमंत पाटील यांनी स्वागत, एस. एस. पवार यांनी प्रास्ताविक, डी. जी. पाटील यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)