सौर ऊर्जेच्या वापरामुळे स्मार्ट सिटीचा शाश्वत विकास शक्य

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

पुणे- बाणेर येथील युथिका अपार्टमेंट्सच्या वतीने येथे स्थापित करण्यात आलेल्या स्मार्ट सोलर प्रकल्पाचे उदघाटन बुधवारी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. सौरऊर्जेचा वापर आणि प्रसार करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने अशा प्रकल्पांना संपूर्ण पाठिंबा व सहकार्य देण्यात येते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशातील 100 टक्के चारचाकी वाहने ही बॅटरी संचलित इलेक्ट्रिक वाहने बनवायची आहेत. एकदा बॅटरी चार्जिंग केल्यास 400 किलोमीटर अंतर जाण्याची क्षमता तयार करण्यात येत आहे. वीजेमुळे प्रवास अत्यंत स्वस्त होईल. राज्यभर चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येतील,’’ अशी माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली.

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “स्मार्ट सिटी मिशनच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्मार्ट सिटीमध्ये किमान १० टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपासून निर्माण करणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने रुफटॉप सौरऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून दिलेले लक्ष्य पार करून, त्यापेक्षा अधिक म्हणजेच १५ ते २० टक्के वीजनिर्मिती करण्याचे पुणे स्मार्ट सिटीचे उद्दिष्ट आहे. तसेच, पुढे हे प्रमाण वाढवून पुणे शहराला ही १ गिगावॉट नवीकरणक्षम ऊर्जेतून वीजनिर्मिती करणारे देशातील पहिले शहर बनवण्याची पुणे स्मार्ट सिटीची महत्त्वांकाक्षा आहे.”
सौर ऊर्जा वापराची प्रणाली आत्मसात करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि इतर आस्थापनांसाठी अनुकरणीय असे मॉडेल तयार करण्याच्या दृष्टीने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (PSCDCL) या क्षेत्रातील आघाडीच्या तीन कंपन्यांसोबत स्वतंत्र सामंजस्य करार केले आहेत. सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करणाऱ्या टीईपी सोलर, क्लीनमॅक्स एनव्हायरो एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि आदित्य ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार करून एकत्रितपणे पुणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पुणे शहर व परिसरात रुफटॉप फोटोव्होल्टाइक सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)