बीजिंग (चीन) – सौर ऊर्जा निर्मितीत चीनने गगनभरारी घेतली आहे. सौर ऊर्जानिर्मितीत चीन जगात प्रथम स्थानावर असून जगातील कोणत्याही देशापेक्षा चीनमध्ये सौर ऊर्जा अधिक प्रंमाणात निर्माण होते. तज्ज्ञांच्या मते चीन 130 गीगावॅट (13 हजार कोटी किलोवॅट) सौर ऊर्जा निर्मिती करत आहे.

आपल्या सौर ऊर्जेने चीन ब्रिटनची विजेची गरज अनेकवेळा पूर्ण करू शकतो. जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्लांट तेंगरच्या वाळवंटात उभारण्यात आला आहे. या प्लांटची वीजनिर्मिती क्षमता 850 मेगावॅट आहे. यात 40 लाख सोलर पॅनेल बसवण्यात आले आहेत. सोलर पॅनेल बनवणारा चीन हा जगातील अव्वल देश आहे. आयईए (इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी) नुसार जगातील 60 टक्के सोलर पॅनेल्स चीनमध्येच तयार होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)