सौरभ चौधरी राष्ट्रीय नेमबाजी पात्रता फेरीत चमकला

नवी दिल्ली: आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेता नेमबाज सौरभ चौधरीने राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्‍यपद स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अखेरच्या पात्रता फेरीत 248. 2 गुण मिळवत पहिले स्थान काबीज करताना विश्वविक्रमापेक्षाही सरस कामगिरी केली. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला युक्रेनचा नेमबाज ओले अमयुलचुक याने म्युनिच येथील स्पर्धेत 243. 6 गुण मिळवत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात विश्वविक्रम नोंदवला होता. सौरभची कामगिरी त्याच्यापेक्षा 4. 6 गुण फरकाने सरस होती.

16 वर्षीय सौरभने ज्युनिअर विभागाचे विजेतेपद 245. 5 गुण कमवत मिळवले. ही कामगिरी करताना त्याने स्वतःच रचलेल्या विश्वविक्रमी कामगिरीची बरोबरी केली. सौरभने यंदाच्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेतदेखील सुवर्णपदक जिंकले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)