सौरउर्जेचा वापर करणारे पुणे विद्यापीठ पहिले

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर : विद्यापीठात सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

पुणे – देशभरात सौरउर्जेचा वापर करणारे पहिलेच विद्यापीठ म्हणून “ग्रीन एनर्जी मिशन’मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला याचा अभिमान वाटतो. एकूण चौदा इमारतींवर आता सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. यामधील पहिल्या टप्प्यात 6 इमारतींसाठी सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती कुलगुरू नितीन करमळकर यांनी दिली.

पुणे विद्यापीठात आज सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्‌घाटन करमळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम यांची उपस्थिती होती. विद्यापीठातील आंतरशाखीय ऊर्जा अभ्यासप्रणाली विभागांतर्गत 602 किलोवॅट पीट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे कामकाज पाहिले जात आहे.

या प्रकल्पाविषयी माहिती देताना आंतरशाखीय ऊर्जा अभ्यासप्रणाली विभागाचे संचालक डॉ. संदेश जाडकर म्हणाले, या प्रकल्पासाठी विद्यापीठ आवारातील सर्व इमारतींचे निरीक्षण करण्यात आले. त्यामधील 14 इमारतींवर हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात पुढील सात इमारतींवर हा प्रकल्प 20 सप्टेंबर 2018 पर्यंत कार्यान्वित केला जाईल.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात विधी विभाग, सेंटर फॉर मॉडेलिंग अॅन्ड सिम्युलेशन, आंबेडकर भवन, जयकर ग्रंथालय, कॅप भवन, डिपार्टमेंट ऑफ टेक्‍नॉलॉजी या इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे विद्यापीठ आवारातील ऊर्जेच्या गरजेतील 35 लाख इतक्‍या रकमेच्या विजेची दरवर्षी बचत होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)