‘सौभाग्य’ योजनेंतर्गत विदर्भातील ५ हजार २३७ घरांना वीज जोडणी

मुंबई : सौभाग्य योजना सुरु झाल्यापासून राज्यातील एकूण २३ जिल्ह्यांतील १९२ खेडयांना या योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यात आली आहे. यानुसार विदर्भातील सर्वच ११ जिल्ह्यांतील १४० खेडयांतील ५ हजार २३७ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील ४२ खेड्यांतील २ हजार९३८ घरांना, पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यातील ९ खेडयांतील ५४२ घरांना वीज जोडणी देण्यात आली आणि खान्देशातील १०३ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.

सौभाग्य योजनेंतर्गत विदर्भात सर्वात जास्त गडचिरोली जिल्ह्यात वीज जोडणी देण्यात आल्या. गडचिरोली जिल्ह्यातील ८ खेड्यांतील ११५९ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. यासोबत अकोला जिल्ह्यातील ३४ खेडयांमधील ४१० घरांना, अमरावती जिल्ह्यातील २५ खेडयांमधील ७३५ घरांना, भंडारा जिल्हयातील ७ खेडयांतील २४४ घरांना, बुलडाणा जिल्ह्यातील २२ खेडयांतील ५६५ घरांना,चंद्रपूर जिल्ह्यातील ७ खेड्यांतील ७४४ घरांना, नागपूर जिल्ह्यातील ४ खेडयांतील १०२ घरांना, गोंदिया जिल्ह्यातील ३ खेडयांतील ५९ घरांना, वाशिम जिल्ह्यातील १५ खेड्यांतील ४२६ घरांना, यवतमाळ जिल्ह्यातील १३ खेड्यांतील ७८८ घरांना, वर्धा जिल्ह्यातील २ खेड्यांतील ५ घरांना  सौभाग्य योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)