सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीचा येमेनच्या बंदरावर हल्ला

सना : सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएइने येमेनच्या बंदरावर हल्ला चढवला आहे. हुदायदा हे सौदीचे सर्वात मोठे बंदर आहे. गेली तीन वर्षे हौती बंडखोर आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये गेली तीन वर्षे लढाई सुरु आहे. गेल्या महिन्यात युएईने येमेनचे सोकोत्रा बेट ताब्यात घेतले होते. त्यामुळे या परिसरात तणाव अधिकच वाढला होता.

बुधवारी सकाळपासून सौदी अरेबियाने हुदायदाच्या आसपास हौती बंडखोरांच्या केंद्रावर हल्ला चढवला. त्यांना येमेनच्या सैनिकांच्या तुकडीनेही मदत केली. हुदायदा ताब्यात घेतल्यामुळे येमेनमधून बंडखोरांच्या गटाला बाहेर काढण्यात यश मिळेल असे बोलले जात आहे.

हे तांबड्या समुद्राच्या काठावर असणारे बंदर सौदी आणि येमेन सरकारच्या ताब्यात आल्यामुळे बाब अल-मंदाब सामुद्रधुनीवर ताबा मिळवणे शक्य होणार आहे. तसेच इराणचा बंडखोरांशी संपर्क तोडणेही आता शक्य होणार आहे. येमेनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात दुष्काळ असून दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला येथून रसद पुरवता येईल. हुदायदामध्ये 6 लाख लोक राहातात. त्या सर्वांना दुष्काळाची आणि युद्धाची झळ बसलेली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)