सौदी अरेबियाने उद्धवस्त केले शिया बंडखोरांचे शहर

फोर्सच्या ऑपरेशनमध्ये नष्ट झालेले आवामिया शहर…

रियाध- सौदी अरेबियातील पूर्व भागात बंडखोरांना नष्ट करण्यासाठी सुरक्षा अभियान चालवले जात आहे. या अभियानामुळे सौदीतील छोटे शहर आवामियाला सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागले. हा शिया मुस्लिम बहुल लोकांचा भाग आहे. फौजांच्या कारवाईमुळे येथील शेकडो घरे उद्धवस्त झाली आहेत. या युद्धमोहिमेमुळे हजारो लोक शहर सोडून गेले आहेत.

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या बंडखोरांना संपविण्यासाठी फौजा आवामियात मागील 3 महिन्यांपासून अभियान चालवत आहे. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, फौजांनी कारवाई वेगाने सुरु केल्याने या आठवड्यात 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. लोकांचे म्हणणे आहे की, या ऑपरेशनमुळे या शहरातून सुमारे 20 हजार लोक दुसऱ्या शहरात स्थलांतरित झाले आहेत. तेथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या माहितीनुसार, या कारवाईमध्ये आतापर्यंत 5 बंडखोरांसोबतच 23 नागरिक मारले गेले आहेत.स्थानिक्‍ प्रसिद्धी माध्यमांच्या वृत्तानुसार, बुधवारी झालेल्या गोळीबारात तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. यात लोकांच्या घरांसोबतच धार्मिक स्थळांचेही मोठे नुकसान झाले आहे.

संयुक्‍त राष्ट्राने यापूर्वीच या 400 वर्षे जुन्या शहराचा सांस्कृतिक वारसा नष्ट होण्याने चिंता व्यक्त केली आहे. 30 हजार लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा शहरातील लोक सौदी अरेबियातील सरकारचा विरोध करत आला आहे. मागील वर्षी या देशात एक शिया धर्मगुरू निम्र अल-निम्र यांना फाशीची शिक्षा दिल्यानंतर शिया लोक असलेल्या बंडखोरांचा विरोध वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)