सौदी अरेबियातही प्रदर्शित होणार अक्षयचा “गोल्ड’

बॉलीवुडमधील इंटरनॅशनल खिलाडी म्हणजे अभिनेता अक्षय कुमार याचा “गोल्ड’ चित्रपटाने दिमाखदार एन्ट्री केली आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टचा मुहूर्त साधून प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग करत अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले होते. हा चित्रपट आता आणखी एक नवा विक्रम रचण्याच्या तयारीत आहे.

सौदी अरबमध्येही “गोल्ड’ चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. आता सौदी अरेबियातही स्वातंत्र्यानंतर मिळवलेल्या पहिल्या ऑलिम्पिक पदकाची कथा दाखवली जाणार आहे. “गोल्ड’ हा सौदी अरबमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरणार असल्यामुळे “गोल्ड’ चित्रपट पुन्हा एक नवा विक्रम स्थापित करणार असल्याची माहिती अक्षय कुमारनेच त्याच्या ट्विटरवर शेअर केली आहे.

भारतीय टीमने 1948 साली लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण जिंकून इतिहास निर्माण केला होता. आता अक्षयच्या “गोल्ड’नेही नवा इतिहास निर्माण केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)