सौदी अरेबियाकडून हूती बंडखोरांची क्षेपणास्त्रे नष्ट

रियाध : सौदी अरेबियाच्या वायूदलाने येमेनच्या हूती बंडखोरांकडून डागण्यात आलेली 7 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे नष्ट केली आहेत.  सौदीच्या नेतृत्वाखालील अरब आघाडीचे प्रवक्ते तुर्की अल-मक्की यांनी या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार ठरविले आहे.

तीन क्षेपणास्त्रे रियाध, एक असीर प्रांताच्या खामीस मुशैर आणि एक अन्य नजरान तर दोन जिजानच्या दिशेने डागण्यात आली होती. क्षेपणास्त्रांना हवेतच रोखल्याने याचे स्फोटक तुकडे नजीकच्या नागरी भागात कोसळल्याने एकाचा मृत्यू झाल्याची माहिती अल-मक्की यांनी दिली. सौदी अरेबिया आणि क्षेत्राची सुरक्षा धोक्यात आणण्याचा हा या हल्ल्यामागचा उद्देश होता. इराणचे समर्थनप्राप्त असणाऱया हुती गटाच्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे मक्की म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)