सौदीवरील क्षेपणास्त्र हल्ल्याचा भारताकडून निषेध

नवी दिल्ली – सौदी अरेबियात रियाध परिसरातील नागरी वस्त्यांवर अलिकडेच जे क्षेपणास्त्र हल्ले झाले त्याचा भारताने निषेध केला आहे. येमेनमधील बंडखोरांकडून हा हल्ला झाल्याचा सौदीचा आरोप आहे. सर्वच प्रकाराच्या दहशतवादी कारवायांना संघटीतपणे पायबंद घातला पाहिजे असा निर्धार भारताने व्यक्त केला आहे.

भारतीय परराष्ट्र व्यवहार खात्याच्या प्रवक्‍त्याने सांगितले की तेथील संघर्षात झालेली वाढ चिंताजनक असून तेथे निपराध नागरीकांना लक्ष केले जात आहे हे अधिक चिंताजनक आहे. सर्वच प्रकारच्या दहशतवादाचा यापुढे संघटीतपणे बिमोड करण्याची वेळ आली आहे. येमेनी बंडखोरांकडून सौदीतील एकूण चार ठिकाणांवर अलिकडेच क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले त्यात एक जण ठार तर इतर अनेक जण जखमी झाले आहेत. क


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)