सौदीतील पत्रकाराची तुर्कीत हत्या ? जगभरातून पत्रकाराच्या बेपत्ता होण्याविषयी चिंता 

वॉशिंग्टन: सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खशोगी यांची तुर्की येथील सौदीच्या दूतावासात हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण याबाबत सौदीच्या राजांशी चर्चा करू असे म्हटले आहे. अमेरिकेतील अनेक संसद सदस्य तसेच विविध देशांच्या प्रतिनिधींनी या प्रकरणात ट्रम्प यांनी लक्ष घालावे अशी सुचना केली होती.

खाशोगी हे तुर्कीतील सौदी अरेबियाच्या दूतावासात आपली काही कागदपत्रे आणण्यासाठी गेले होते. तेव्हापासून त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाहीं. त्यांची तेथेच हत्या करण्यात आली असावी असा कयास व्यक्त केला जात आहे. सौदीतील राजवटीच्या विरोधात त्यांनी काही दिवसांपुर्वी लिखाण केले होते त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली असावी असा कयास आहे.

-Ads-

खाशोगी हे 59 वर्षांचे होते व ते वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकन दैनिकातही नियमीतपणे लिखाण करीत असत. या प्रकरणी आपण सौदीचे राजे सलमान यांच्याशी संपर्क साधणार आहोत असे ट्रम्प यांनी आज जाहीर केले. तुर्कीत घडलेली ही घटना भयावह आहे. तेथे नेमके काय झाले याची आपण माहिती घेऊ. या पत्रकाराचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. त्यांचे नेमके काय झाले आहे याची माहिती घेतली जात आहे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. खगी यांच्या बेपत्ता होण्यावर अमेरिकेने त्वरीत कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी अमेरिकन संसदेच्या विदेश व्यवहार समितीचे अध्यक्ष एड रॉयसी आणि सदस्य एलिओट एंजल यांनी अध्यक्षांना लिहीलेल्या पत्रात केली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)