सौदीच्या राजपुत्राचे पुलवामा हल्ल्यावर मौन 

दहशतवादाविरोधात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन 

नवी दिल्ली – पाकिस्तानचा दौरा संपवून सौदीचे राजपूत्र मोहम्मद बिन सलमान भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांनी दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. पण पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतावर केलेल्या पुलवामा हल्ल्याबाबत चकार शब्दही काढला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

युवराज सलमान यांचे मंगळवारी रात्री भारतात आगमन झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजशिष्टाचार बाजूला ठेवून सलमान यांचे स्वागत करायला विमानतळावर गेले होते. आज सकाळी राष्ट्रपती भवनात त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर हैदराबाद हाऊस इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सलमान यांच्यात शिष्टमंडळासोबत विविध विषयांवर चर्चा झाली.

मोहम्मद बिन सलमान यांनी पाकिस्तानवर दबाव टाकावा अशी भारताला आशा होती. मात्र मोदींसोबतच्या पत्रकार परिषदेत राजपुत्रांनी पुलवामा हल्ल्याचा साधा उल्लेखही केला नाही. “कट्टरतावाद व दहशतवादासारख्या मुद्द्यावर आम्ही भारताच्या सोबत आहोत. गुप्तचर यंत्रणेसह अन्य सर्व प्रकारचं सहकार्य करण्याची आमची तयारी आहे, असे सलमान म्हणाले.
दरम्यान, सलमान आणि आणि नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज पाच करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. दोन्ही देशांदरम्यान ऊर्जा, संरक्षण, पर्यटन, विज्ञान-तंत्रज्ञान आणि व्यापार या विषयांवर सहकार्याचे करार करण्यात आले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे प्रसारमाध्यमांना संबोधित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)