सौदीच्या प्रिंसनेच केली खाशोगींची हत्या 

सीआयए चौकशीतील निष्कर्ष 

वॉशिंग्टन: पत्रकार खाशोगी यांची तुर्कस्तान मध्ये झालेली हत्या सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिंस मोहंमद बिन सलमान यांच्या आदेशावरूनच करण्यात आल्याची माहिेती सीआयए या अमेरिकन गुप्तचर विभागाने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाली आहे. स्वत: सौदी अरेबियाच्या सरकारने या हत्येच्या चौकशीचा फार्स केला होता. त्यात त्यांनी सौदीच्या प्रिंसचा यात कोणताच सहभाग नसल्याचे नमूद केले होते. त्यांचा चौकशी अहवाल कालच जाहीर करण्यात आला आहे त्या पार्श्‍वभूमीवर सीआयएने थेट सौदी प्रिंसवरच ठपका ठेवल्याने मोठीच खळबळ उडाली आहे.
पत्रकार खाशोगी प्रकरण दडपायचे नाही त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करायचा असा निर्धार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीच्या राष्ट्रप्रमुखांशी फोनवर झालेल्या चर्चेत नमूद केले आहे.

सीआयएने केलेल्या चौकशीत असे निष्पन्न झाले आहे की सौदीचे पंधरा एजंट सरकारी विमानाने इस्तंबुलला आले. त्यांनीच सौदीच्या प्रिंसच्या आदेशानुसार खाशोगी यांची सौदीच्या इस्तंबुल येथील दूतावासात बोलावून घेऊन हत्या केली. तथापी सौदीने म्हटले आहे की आम्ही पत्रकार खाशोगी यांना सौदीत परत बोलावून आणण्यासाठी हे पंधरा जणांचे पथक तिकडे पाठवले होते.

सौदीचे प्रिंस हे त्या देशातील सर्वात शक्तीशाली व्यक्तीमत्व आहे. सौदीतील काहीं सूत्रांच्या म्हणण्यानुसार ते चांगले टेक्‍नोक्रॅट आहेत पण त्यांच्या स्वभावाचा नेमका ठाव लागत नाही. ते कधीही कोणतेह रूप धारण करू शकतात. एकाच वेळी ते शुन्यावरून 60 चा स्पीडही गाठू शकतात. काही गोष्टी आपण करणे योग्य नाही हे त्यांच्या लेखीच नसते असेही सौदीच्या काही सूत्रांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्याच गुप्तचर विभागाने त्यांच्यावर या हत्या प्रकरणाचा ठपका ठेवल्याने अमेरिका आता त्यांच्यावर कोणती कारवाई करणार या विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)