सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीचा इराणला सज्जड इशारा

रियाध – येमेनी बंडखोरांकडून सौदी अरेबियाच्या दिशेने क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा अलिकडेच जो प्रकार झाला, त्या मागे इराणचा हात असल्याचा आरोप सौदी अरेबियाने केला आहे. या प्रकाराबद्दल इराणला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडीने दिला आहे. सौदीच्या लष्कराने म्हटले आहे की गेल्या रविवारी आमच्या दिशेन धाडण्यात आलेली येमेनी बंडखोरांची सात क्षेपणास्त्रे आम्ही हाणून पाडली आहेत. यातील एका क्षेपणास्त्राची क्षमता राजधानी रियाधवर हल्ला करण्‌याची होती.

येमेनच्या हौथी बंडखोरांना इराणने ही क्षेपणास्त्रे पुरवली असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे असे सौदीच्या लष्करी सूत्रांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच त्यांनी यावेळी या क्षेपणास्त्रांचे काही अवशेषही पत्रकारांना दाखवले. आता या हल्ल्याला कसा प्रतिसाद द्यायचा तो हक्क आम्ही राखून ठेवला आहे असे या आघाडीचे प्रवक्ते तुर्की अल मलकी यांनी सांगितले. पण आमचा प्रतिसाद हा अत्यंत जोरदार असेल असेही त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की इराणने येमेनी बंडखोरांशी हातमिळवणी केली असून ते तेथील साना विमान तळावरून सौदीच्या दिशेने क्षेपणास्त्रांचा मारा करीत आहेत. दरम्यान इराणने सौदीचा हा आरोफ फेटाळून लावला आहे. येमेनी बंडखोर आणि सौदीतील या संघर्षाला तीन वर्ष झाली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)