सौदा एका महागड्या महालाचा

मुंबईत वन आरके खरेदी करायचे म्हटले तरी 50 लाख रुपये मोजावे लागतात. सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेलेली मुंबई ही आता धनाढ्य व्यक्तींपुरतीच मर्यादित राहिली आहे. कोट्यवधी आणि अब्जावधीचे व्यवहार दररोज मुंबईत होतात. त्याची कल्पनाही साध्या व्यक्तीला नसते. मुंबईत सर्वकाही मिळते, पण घर मिळत नाही. ही बाब गेल्या पाच-सहा दशकांपासून आहे आणि आजही तीच स्थिती आहे.

अलीकडेच नेपियन सी रोडवर एका महालाचा एक चर्तुथांश भाग विकला गेला तोही 180 कोटीला. यावरून संपूर्ण महालाची किंमत किती असेल, हे सांगणे कठिण आहे आणि किमान सामान्य व्यक्तीला सांगताही येणार नाही.

नेपियन सी रोडवर प्रसिद्ध किलाचंद हाऊस हा महानगरातील शेवटचा महाल म्हणून ओळखला जातो. अलिकडेच या महालाचा एक चर्तुथांश भाग 180 कोटी रुपयांना विकला. ही मालमत्ता ऍडेल इन्व्हेस्टमेंट प्रा.लि.ने नमन हाऊसिंग प्रा.लिमीटेडला विकली. विक्री केलेल्या भागाचे क्षेत्रफळ सुमारे दहा हजार चौरस मीटर आहे. हा भाग अगोदर ऑर्बिट कॉर्पोरेशनने 2010 मध्ये खरेदी केला होता. ही मालमत्ता 4 मे 2016 ला ऑर्बिटचे पुजित अग्रवाल यांनी ऍडेल इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने 145 कोटींना ट्रान्सफर केली होती.

किलाचंद हाऊस हा सुमारे एक लाख चौरस मीटरवर उभारलेले असून तो शहरातील शेवटचा महाल म्हणून ओळखला जातो. मूळ रुपाने ही मालमत्ता पतियाळाच्या महाराजांची होती. त्यानंतर देवचंद किलाचंद यांनी खरेदी केली. पुन्हा किलाचंद यांच्या वारशांत समान रुपाने ही मालमत्ता विभागली गेली. त्यापैकी एका हिस्सेदारांनी आपल्या हिश्‍श्‍याचा एक चर्तुथांश भाग ऑर्बिट डेव्हलपर्सला 2010 मध्ये विकला. पुढे नमन हाऊसिंगला त्याची विक्री करण्यात आली. आता किलाचंद हाऊसच्या 25 हजार चौरस फुट क्षेत्रावर नमन हाऊसचा अधिकार आहे. या व्यवहाराला 28 मार्च रोजी अंतिम स्वरुप दिले गेले. रजिस्ट्रीसाठी विकासकाने मुद्रांक शुल्क रुपातून 9 कोटी रुपये भरले.

अपर्णा देवकर 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)