सौताडा रस्ता लुटीतील आरोपी 17 तासात जेरबंद

जामखेड – सौताडा घाटात गाड्या अडवून लुटणाऱ्या टोळीतील एका आरोपीस जामखेड पोलिसांनी अवघ्या 17 तासात 27 हजाराच्या रोख रकमेसह गेवराई तालुक्‍यातील पाचेगाव येथून अटक केली. न्यायालयाने या आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 29 सप्टेंबर रोजी फिर्यादी सचिन अंकूश खोके (रा.झिरपे.ता.अंबड.जि.जालना) यांची जामखेड शहराजवळील सौताडा घाटात गाडी नादुरूस्त झाल्याने बंद पडली होती. त्यामुळे ते घाटात रस्त्याच्या कडेला गाडी लावुन गाडीतच झोपला होता. पहाटे 5.30 वाजेदम्यान एका अज्ञात एका गाडीतून 3-4 जण उतरले. त्यांनी गाडीच्या काचा फोडून आत प्रवेश करून चालकाच्या खिशातील 27 हजार रुपये रोख रक्कम व 5 हजारांचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला. सुमो गाडीत बसुन सर्वजण पळून गेले.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे, पो.कॉ. गणेश साने, पो.कॉ.गाडे, पो.ना.भागवत, पो.ना. बढे यांच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवत गुप्त माहितीनुसार सापळा लावून आरोपी विलास विष्णू राठोड (तांडा पाचेगाव, ता. गेवराई. जि. बीड) याला लाल रंगाच्या सुमो गाडी नं (एमएच 23 यूई 5425) या गाडीसह त्याच्याकडून 27 हजार रुपये रोख व 5 हजार किमतीचा मोबाईल हस्तगत केला. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. खोके याच्या रस्ता लूटीच्या मोठ्या टोळीशी संबंध असून त्याचे बाकी साथीदार अद्याप फरार आहे.त्यामुळे रस्तालुटीचे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्‍यता असल्याची माहिती जामखेड पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे हे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
27 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)