सौंदर्यात खोबरेल तेलाचा अनोखा फायदा…

मेकअपमुळे सौंदर्यात अजूनच भर पडते. यामुळे मेकअप करण्यास मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, मेकअप करणे जेवढे महत्त्वाचे आहे. तेवढेच काढणेही खूप महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला महागडी मेकअप रिमूव्हर्स वापरण्याचीही काहीच गरज नाही. तुम्ही खोबरेल तेलाचा वापर फेशिअल क्‍लीनजर आणि मेकअप रिमूव्हर म्हणून करू शकता.

मेकअप रिमूव्हर

मेकअप काढण्यासाठी कापसाच्या बोळ्यावर खोबरेल तेलाचे 2 -3 थेंब घ्या आणि सगळ्यात आधी डोळ्यावरचा मेकअप काढा. त्यानंतर कापसाचा दुसरा बोळा घेऊन डोळ्यावरून फिरवा. डोळ्यांवरील मेकअप पूर्णपणे निघाल्यास असे एक-दोनदा करणे पुरेसे आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण चेहरा स्वच्छ करा.

क्‍लीन्जर

वाढत्या प्रदूषणामुळे चेहरा खराब होतो. तो पुन्हा चमकदार करण्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त ठरते. यासाठी प्रथम फक्त पाण्याने चेहरा धुवून कोरडा करा. खोबरेल तेलाचे 2-3 थेंब हातावर घेऊन चोळा व तेल चेहऱ्याला लावा. बोटांनी हलकेच मसाज करा. त्यानंतर चेहरा धुण्याऐवजी टिशू पेपर किंवा मऊ कपड्याने चेहरा पुसून घ्या. यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ होईल.

इतर फायदे

त्वचेचे माईश्‍चराइजर होऊन ती मुलायम होते.

चेहरा तेलाने स्वच्छ केल्यावर तुम्ही लगेच त्यावर मेकअप करू शकता. यामुळे चांगला बेस तयार होईल आणि मेकअप अधिकच खुलून दिसेल.

या परिणामकारक उपायामुळे फेसवॉश किंवा मेकअप रिमूव्हर्सची गरज पडणार नाही.

त्वचा चमकदार दिसते. कोरड्या त्वचेसाठी हे चांगलेच फायदेशीर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)