सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी अमित शहांना दिलासा 

दोषमुक्तीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली 

मुंबई: बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना निर्दोष सोडण्याच्या सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याचा या प्रकरणाशी कोणताही थेट संबंध प्रस्थापित होत नसल्याचे स्पष्ट करून याचिका फेटाळून लावली. मात्र या निर्णयाविरोधात याचिकाकर्ते बॉम्बे लॉयर्स असोसिएशन सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात अमित शहा यांना निर्दोष सोडण्याच्या सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान न देणाऱ्या सीबीआयची भुमीका ही संशयास्पद आहे, असा आरोप करून आव्हान देण्याचे सीबीआयला निर्देश द्या, अशी विनंती करणारी जनहित याचिका बॉम्बे लॉयर्स असोसिएशने जानेवारी महिन्यात उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्या याचिकेवर न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांनी अमित शहा यांना सीबीआय कोर्टाने दोषमुक्त केल्यावर त्या निर्णयाविरोधात हायकोर्टात दाद का मागण्यात आली नाही? असा सवाल उपस्थित करून सीबीआयची ही भुमिका संशयास्पद असल्याचा दावा केला होता. तसेच या प्रकरणात हायप्रोफाईल लोकांचे हात असल्याने सर्वोच्च न्यायालयाने हा खटला गुजरातऐवजी महाराष्ट्रात चालवावा असे आदेश दिले होते. तसेच एखादी व्यक्ती गुन्हेगार असेल तरीही त्याला घटनेच्या कलम 21 नुसार जगण्याचा अधिकार आहे. असा युक्तीवाद याचिकाकर्त्यांच्यावतीने ज्येष्ठ वकील ऍड. दुष्यंत दवे यांनी केला होता.

तर सीबीआयने याचिकेलाच जोरदार विरोध केला. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात दिलेल्या निर्णयाचे आम्ही पालन
केले. सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत राहून करण्यात आली असून दोषमुक्तीला आव्हान न देणे हा सारासार विचार करुन घेतलेला निर्णय आहे असा दावा केला. उभय पक्षांच्या युक्तीेवादानंतर न्यायालयाने राखून ठेवलेला निर्णय जाहिर करताना याचिका फेटाळून लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)