सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणी सीबीआयला नेत्यांना अडकवायचे होते – न्यायालय

मुंबई – सोहराबुद्दीन शेख कथित चकमकप्रकरणी सीबीआय सत्य शोधण्याऐवजी आधीच सिद्धांत मांडून राजकीय नेत्यांना अडकवण्याचा उद्देश होता, असे मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने निकालात म्हंटले आहे.

सोहराबुद्दीन शेख कथित चकमकप्रकरणी २१ डिसेंबर रोजी न्यायालयाने अंतिम सुनावणी केली. या सुनावणीच्या प्रती शुक्रवारी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.जे. शर्मा यांनी सीबीआयवर गंभीर आरोप करत सत्य शोधण्याऐवजी सिद्धांत मांडून राजकीय नेत्यांना अडकवायचे होते, असे निकालात म्हंटले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांचा २००५ साली चकमकीत मृत्यू झाला होता. तर या प्रकरणातील मुख्य साक्षीदार तुलसीराम प्रजापतीचा २००६ मध्ये चकमकीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात खटला चालवण्यात आला होता.  २१ डिसेंबर रोजी न्यायालयाने सर्व २२ आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)