सोहराबुद्दीन शेखला वंजारा यांनीच दिली सुपारी; साक्षीदाराची खळबळजनक माहिती

हरेन पंड्या यांना संपवण्याचे वंजारांना होते आदेश 

38 पैकी 16 आरोपीची मुक्‍तता… 
या बनावट चकमकीतील 38 पैकी 16 आरोपींची सत्र न्यायालयाने मुक्‍तता केली. 2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या मागणीनुसार सोहराबुद्दीन बनावट चकमकीचे प्रकरण महाराष्ट्रात हलवले. या आरोपींमध्ये गुजरातच्या पोलिस अधिकाऱ्यांबरोबर, राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनाही आरोपमुक्‍त करण्यात आले होते. शहा यांचे नाव राजकीय हेतूसाठी या प्रकरणात गोवण्यात आल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. 

नवी दिल्ली: गुजरातचे माजी गृहमंत्री दिवंगत हरेन पंड्या यांना संपवण्याची जबाबदारी गुजरातचे माजी पोलिस महासंचालक डी.जी. वंजारा यांच्यावर सोपवण्यात आली होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीतील एका साक्षीदाराने केला आहे. पंडया यांना संपवण्याचे कॉंट्रॅक्‍ट सोहराबुद्दीनला देण्यात आले होते. त्यानुसार सोहराबुद्दीनचा साथीदार तुळशीराम प्रजापतीने ही कामगिरी पार पाडली, असेही या साक्षीदाराने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आझम खान असे या साक्षीदाराचे नाव आहे. हरेन पंड्या यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याला आपण वंजारा यांच्या कथित सहभागाबाबत सांगितले होते. मात्र या तपास अधिकाऱ्याने वंजारा यांच्याबाबतचा उल्लेख आपला जबाबामध्ये समाविष्ट करण्यास नकार दिला होता, असेही खान यांनी म्हटले आहे.

डी.जी.वंजारा यांच्यावर सोहराबुद्दीन शेखची बनावट चकमकीत हत्या केल्याचा आरोप होता. या आरोपाखाली 9 वर्षे तुरुंगात काढल्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांची या आरोपातून मुक्‍तता झाली होती.

गुजरातचे तत्कालिन गृहमंत्री असलेल्या हरेन पंड्या यांची 2003 मध्ये अहमदाबादेत हत्या झाली होती. गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगलीचा सूड म्हणून ही हत्या झाली असावी, असा सीबीआयचा दावा होता. या प्रकरणातील सर्व 12 आरोपींची गुजरात उच्च न्यायालयाने पुराव्याअभावी मुक्‍तता केली होती. याच कालावधीत नोव्हेंबर 2005 मध्ये सोहराबुद्दीनची कथित बनावट चकमकीत हत्या झाली होती. दहशतवादी हल्ल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्या करण्याचा कट तो करत होता, असा दावा गुजरात “एटीएस’ने केला होता.

आपण 2002 मध्ये सोहराबुद्दीनला भेटलो आणि त्याचे मित्र झालो होतो. त्यानेच हरेन पंड्या यांच्या हत्येसाठी वंजारा यांच्याकडून आपल्याला पैसे मिळाले असल्याचेही त्याच्याकडूनच आपल्याला समजल्याचे आझम खान यांनी सांगितले. नंतर गुजरात पोलिसांनी सोहराबुद्दीन आणि त्याची पत्नी कौसर बी ची डिसेंबर 2006 मध्ये बनावट चकमकीत हत्या केल्याचे सोहराबुद्दीनचा साथीदार तुळशीराम प्रजापती याच्याकडून कळाल्याचे आझम खानने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)