सोहराबुद्दीन चकमक प्रकरणी याचिकांवर एकत्रीत सुनावणी

मुंबई – बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी आरोपींना निर्दोशष सोडण्याच्या सत्र न्यायालयाच्या निकाला विरोधा सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीनने दाखल केलेली याचिका तसेच काही आरोपींच्या दोषमुक्ततेला सीबीआयने दिलेल्या आव्हान याचिकांची उच्च न्यायालयाने गंभरा दखल घेतली. न्यायामूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांनी दोषमुक्त ठरवण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे, त्यांच्यावरील आरोप आणि कलमे यांचा तपशील सादर करण्याचे निर्देश सीबीआयला देऊन याचिकेची सुनावणी 9 फेब्रुवारीला निश्‍चित केली आहे

सत्र न्यायालयाच्या विषेश न्यायालयाने ऑगस्ट 2016 ते ऑगस्ट 2017 या कालावधीत डी जी वंजारा(सेवानिवृत्त), राजकुमार पंडियान आणि दिनेश एम एन या आयपीएस अधिकाऱ्यांची दोषमुक्तता केली न्यायालयाच्या त्या आदेशांना आव्हान देणारा अर्ज रुबाबुद्दीन शेखने दाखल केले आहेत तर सीबीआयने आरोपपत्रात नमूद केलेल्या 38 जणांपैकी 15 जणांना कनिष्ठ न्यायालयाने दोषमुक्त ठरवले. त्यचा पैकी काही आरोपींच्या सुटकेला आव्हान दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)