सोहम, कल्पतरू चॅलेंजर्समधील उत्कंठावर्धक सामना

अजय शितोळेचे स्पर्धेतील पहिले शतक : शेवटच्या चेंडूवर धावबाद झाल्याने सोहम सुपरकिंग्ज विजयी
नगर – वाडियापार्क येथे आ. अरुण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा किकेट असोसिएशन आयोजित अहमदनगर प्रिमियर लिग किकेट स्पर्धेतील कालचा दिवस प्रत्येकाच्या स्मरणात राहील. यात नरेंद्र फिरोदिया यांच्या सोहम सुपरकिंग्ज व गौरव फिरोदिया यांच्या कल्पतरू चॅलेंजर्स संघात झालेला सामना अत्यंत अटीतटीचा होऊन प्रत्येकाचीच उत्कंठा वाढविणारा ठरला. कल्पतरू चॅलेंजर्सच्या अजय शितोळे याने एपीएल स्पर्धेत 102 धावा करून स्पर्धेतील पहिले शतक पूर्ण केले.
सोहम व कल्पतरू यांच्यातील सामन्यात सोहमने 20 षटकांत 7 बाद 169 धावा केल्या. त्या बदल्यात कल्पतरूनने 20 षटकांत 7 बाद 168 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर 1 धाव काढण्याची गरज असताना खेळाडू रनआऊट झाल्याने सोहम सुपरकिंग्जचा 1 धावाने विजय झाला. सोहमच्या अजीम काझी याने 79 धावा केल्या. कल्पतरूच्या अजय शितोळे 102 धावा करीत 2 बळी घेतल्याने तो सामन्याचा मानकरी ठरला. त्यास फिरोदिया यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कोहिनूर चॅम्पीयन्स व विरा लायन्स यांच्यातील सामन्यात कोहिनूरने 20 षटकांत सर्व बाद 141 धावा केल्या. त्या बदल्यात विरा लायन्सने 19.3 षटकांत 7 बाद 142 धावा करीत विजय मिळविला. कोहिनूरच्या प्रवीण कांबळेने 51 धावा, विराचा सौरभ संकलेचाने 49 धावा केल्या. श्रीपाद निंबाळकरने 40 धावा देऊन 4 बळी घेतले. तो सामनावीर ठरला. प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते त्याला सन्मानित करण्यात आले.
कोहिनूर चॅम्पीयन्स व कल्पतरू चॅलेंजर्समधील सामन्यात कोहिनूरने 20 षटकांत 7 बाद 174 धावा केल्या. या धावसंयेचा पाठलाग करताना कल्पतरूचा संघ केवळ 169 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यामुळे कोहिनूरचा संघ 5 धावांनी विजयी झाला. या सामन्यात कोहिनूरच्या पंकज सातपुतेने 17 धावा देत 2 बळी घेतले. तो सामन्याचा मानकरी ठरला. अश्विन गांधी यांच्या हस्ते त्याला सन्मानित करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)